Posts

एक रुका हुआ फैसला ! - चित्रपट परीक्षण

Image
आठवणीतील चित्रपट - एक रुका हुआ फैसला  एखाद्या चित्रपटाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी त्या चित्रपटात काय काय गोष्टी असणे आवश्यक आहे ? एखादी बऱ्यापैकी कथा, एक क्रूर आणि महाशक्तिमान खलनायक, त्या खलनायकाकडून अन्याय झालेला एक तरणाबांड आणि देखणा नायक, आणि त्याच्यावर भाळलेली सात जन्मोतक हर सुख आणि महत्वाचे म्हणजे हर दुःखमे हमेशा साथ देनेवाली एक लोभस (सोप्या शब्दात सेक्सी आणि हॉट) नायिका, हाणामाऱ्या प्रचंड सेट्स. ठेका धरायला लावणारी , शृंगारिक भावना उत्तेजित करणारी गाणी ....अन अजून अनेक काही .... आणि एखाद्या चित्रपटात हे काहीच नसेल तर तो चित्रपट कसा असेल ? आज आपण एका अश्याच चित्रपटाविषयी बोलणार आहोत. या चित्रपटाचा कोणी नायक असा नाहीच. किंवा जर असेलच तर त्याचे दर्शन फक्त चित्रपटाच्या सुरवातीच्या काही सेकंदांच्या शॉट मध्ये होते. तो एकही शब्द बोलत नाही. फक्त आपल्या भेदरलेल्या आणि बेडकासारख्या दिसणाऱ्या डोळ्यांनी तो कॅमेरात पाहतो. बस्स ! हा आपला नायक समाजातील अत्यंत गलिच्छ वस्तीत वाढलेला आहे. त्याचा बाप अट्टल जुगारी , बेवडा आहे. आपल्या नायकाला त्याचा हा बाप रोज मारहाण करत असतो. म्हणजे थपडा नाह